पेट्रोलिंगसाठी मुंबई पोलिसांना सायकल

दिवस-रात्र धावणाऱ्या मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांसाठी खास सायकल्स परदेशातून मागवण्यात आल्यात. 

Updated: Jun 11, 2015, 03:13 PM IST
पेट्रोलिंगसाठी मुंबई पोलिसांना सायकल title=

मुंबई : दिवस-रात्र धावणाऱ्या मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांसाठी खास सायकल्स परदेशातून मागवण्यात आल्यात. 

बुधवारपासून हा प्रोजेक्ट चाचणीच्या धर्तीवर सुरू करण्यात आलाय. गर्दीच्या ठिकाणी जिथे मोटारसायकल आणि जिप्स तात्काळ दाखल होऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी तात्काळ दाखल होण्यासाठी तसंच मुंबईच्या सुमद्र किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी या ७ गिअर्स सायकल्सचा वापर होणार आहे. 

यासाठी, एकूण २४ सायकल्स परदेशातून आयात करण्यात आल्यात. यातील ८ समुद्रकिनारी तर १६ रस्त्यांवर गस्त घालण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. या दुचाकी वाहनांचा वापर मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, वांद्रे बँन्डस्टॅन्ड, वरळी सी फेस, शिवाजी पार्क यांठिकाणी गस्त घालण्यासाठी होईल, अशी माहिती संयुक्त पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिलीय. 

अॅल्युमिनियमपासून बनवल्या गेलेल्या आणि बीचवर वापरल्या जाणाऱ्या एका सायकलची किंमत १८,००० तर रस्त्यावर वापरल्या जाणाऱ्या सायकलची किंमत ८००० आहे.  

पोलिसांच्या आरोग्याच्यादृष्टीनंही त्यांना ही सायकलिंग उपयोगीच ठरणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.