मुख्यमंत्री फडणवीस - एकनाथ खडसे यांच्यात मतभिन्नता

राज्यात भाजप सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. खुद्द मुख्यमंत्री आणि नंबर एकचे मंत्री एकनाथ खडसे यांच्यात मतभिन्नता असल्याचं सिद्ध झालंय. 

Updated: Jun 11, 2015, 11:16 AM IST
मुख्यमंत्री फडणवीस - एकनाथ खडसे यांच्यात मतभिन्नता  title=

मुंबई : राज्यात भाजप सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. खुद्द मुख्यमंत्री आणि नंबर एकचे मंत्री एकनाथ खडसे यांच्यात मतभिन्नता असल्याचं सिद्ध झालंय. 

याला निमित्त ठरलंय ते मेट्रो-3 साठी आवश्यक असणा-या कारशेडचा मुद्दा. कारशेड आरे कॉलनीतच होणार असल्याचं निश्चित झालं असून खडसे यांनी आरे जमीन एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यास परवानगी दिलीय.

मुंबईत इतर ठिकाणी आरे इतकी मोठी जागा उपलब्ध नसल्याचं खडसेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे आरेबाबत नेमलेल्या विशेष समितीचा अहवाल अद्याप प्रतीक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यामुळं अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगत मुख्यमंत्र्यांनी खडसेच्या दाव्यातील हवाच काढून घेतलीय.

आरे कॉलनीतली ही कारशेड उभारते वेळी मोठ्याप्रमाणात झाडांची कत्तल होणार आहे. त्यामुळेच या कारशेडला शिवसेना, मनसे आणि भाजपच्याही नेत्यांनी विरोध केला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.