www.24taas.com , मुंबई
तुम्ही आपल्या प्रेयसीसोबत फिरायला जाताय... मग कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रेयसीला ‘किस’ करण्यासाठी तर नाहीच नाही! कारण, अशाच एका प्रियकरानं पोलिसांना चांगलाच धडा शिकवलाय.
गेल्या वर्षी सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रेयसीला ‘किस’ केलं म्हणून असभ्य वर्तनाच्या गुन्ह्याखाली पोलिसांनी कुबेर सारूप या तरुणाकडून दंड व आकारला होता. त्याविरुद्ध सारूपनं पोलिसांविरुद्ध खटला दाखल केला होता. हा खटला त्यानं १ एप्रिल रोजी जिंकलाय. कोर्टाने पोलिसांना दंडाची रक्कम परत करण्याचे आदेश दिलेत.
काय घडलं होतं
‘त्या’ दिवशी कार्टर रोडवर सारुपनं आपल्या प्रेयसीला रिक्षेत बसवून दिलं आणि तिला ‘गुड बाय’ करत गालावर ‘किस’ केलं. यावेळी सारुपच्या प्रेयसीनंही त्याला हरकत घेतली नव्हती. परंतू, त्यावेळी पोलिसांनी मात्र यावेर आक्षेपर घेतला. पोलिसानं सारूपवर ‘मुंबई पोलिस अॅक्ट, सेक्शन ११०’ अन्वये सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तनाच्या गुन्ह्याखाली १,२०० रूपयाचा दंड आकारला आणि त्याला नितीमूल्यांवर एक लांबलचक भाषणही दिलं.
कोर्टात काय झालं
सारूप यांनी पोलिसांच्या या अरेरावी वर्तवणुकीविरुद्ध कोर्टात याचिका दाखल केला. यावेळी पोलीस सारुपवरील गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पोलिसांनी सारुपला दंडाची रक्कम परत करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. कोर्टानं तीन साक्षीदारांची पडताळणी केली असता ते आरोप सारूपला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नसल्याचं सिद्ध झालं.
या विजयानंतर सारुप मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणयाच्या तयारीत आहे. यापुढे कोणत्याही जोडप्याला अशा प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागू नये आणि त्यांना पोलिसांचे अरेरावी दंड भरवा लागू नये, यासाठी आपण हे पाऊल उचलणार असल्याचं सारुपनं म्हटलंय.