मुंबई : दादरमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे वाद चिघळलाय. गुरुवारी दुपारी मनसे नगरसेवक सुधीर जाधव आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
जाधव यांनी आपल्या कार्यअहवालात बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचं छायाचित्र छापल्याच्या कृतीवर शिवसैनिकांनी आक्षेप घेतलाय.
जाधव विभागात मतदारांना वस्तूंचं वाटप करत असल्याचाही शिवसैनिकांचा आरोप आहे. निवडणूक आयोग आणि दादर पोलीस ठाण्यात शिवसेनेने जाधवांविरोधात तक्रार केलीय.
जाधव दादरमधील त्यांच्या वार्डात कार्य अहवाल आणि वस्तूंचं वाटप करताना शिवसैनिक आणि जाधव यांच्यात शाब्दिक राडा झाला. यावेळी शिवराळ भाषेचाही वापर झाला.