मुंबई : गिरगाव वासियांपाठोपाठ आता दादरकरांवर देखील मेट्रो रेल्वेची संक्रांत आलीय.
'मेट्रो-३' प्रकल्पातील स्टेशनसाठी जागा खाली करण्याच्या नोटीसा आता दादरमधील रहिवाशांना पाठवण्यात आल्यात. 'एमएमआरडीए'नं गेल्या २९ मे रोजी या नोटिसा पाठवल्यात.
प्रकल्पासाठी जागा देण्याची मागणी या नोटीशीत करण्यात आलीय. या नोटिसांना उत्तरं देण्यासाठी दादरकरांना १५ दिवसांची मुदत देण्यात आलीय.
दरम्यान, मनसेनं याला तीव्र विरोध केलाय. मराठी माणसाच्या थडग्यावर विकास नको, अशी विरोधाची भूमिका स्थानिक मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी घेतलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.