मुंबई : सासूची हत्या करुन सुनेनं स्वत:च जीवन संपवल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडलीये. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलीये.
हाती आलेल्या माहितीनुसरा, गुरुवारी रात्री सासू-सुनेमध्ये भांडण झाले होते. मुलगा आणि पती घरात नसताना सुनेने सुरुवातीला सासूचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: विष पिऊन आत्महत्या केली.
जेव्हा मुलगा घरात आला तेव्हा त्याने घरात आई आणि आजीला मृतावस्थेत पाहिले. मुलगा रडू लागल्यानंतर शेजाऱ्यांना घडलेला प्रकार समजला. तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलीस पुढे तपास करीत आहेत.