मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गुगलला १९ फेब्रुवारी रोजी खास डुडल तयार करून लावण्यात यावे, यासाठी एक नेटीझन्सची मोहिम सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त गुगल सर्च इंजिनच्या होम पेजवर शिवरायांचे छायाचित्र प्रदर्शित व्हावे, अशी मागणी जगभरातील शिवप्रेमींनी केली आहे.
goo.gl/FmTgNh या लिंकवर जाऊन इंटरनेट युझर्स शिवरायांच्या डूडलसाठी समर्थन देऊ शकतात. याशिवाय गुगलच्या proposals@google.com या अधिकृत ई-मेलवर मेल पाठवून शिवाजी महाराजांच्या डूडलची मागणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सोशल मीडियावर #DoodleofShivray या हॅशटॅगद्वारे टि्वटर, फेसबुकवर देखील मोहीम सुरू आहे.शिवजयंतीला अद्याप एक आठवडयाचा अवधी शिल्लक आहे. गुगलने शिवजयंतीनिमित्ताने डू़डल तयार करावा, यासाठी ऑनलाइन मोहिम सुरु केली आहे.