मुंबई : आरक्षण घटनेनुसारच द्यायला हवे, धनगड आदिवासी आहेत, धनगर नव्हे, असे सांगत आदिवासींच्या हितासाठी मंत्रिपद पणाला लावणार आहे, असा इशारा आदीवासीमंत्री मधुकर पिचड यांनी दिला.
दरम्यान, धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात उद्या राज्य सरकारशी चर्चा होणार आहे. चर्चेनंतर आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत, असं कृती समितीने निर्णय घेतला आहे. तर विरोध करणा-या पिचडांविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही कृती समितीने दिलाय.
धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यासंदर्भात सरकार चर्चेला तयार झालं असून उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्याच्या चर्चेनंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याचं धनगर समाजाच्या कृती समितीचे अध्यक्ष हणुमंत सूळ यांनी सांगितलंय.
धनगर समाजाचा आदिवासींमध्ये समावेश करण्यास आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळं धनगर समाजानं आंदोलन तीव्र करत पिचडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत निषेध केला. धनगर समाजाच्या कृती समितीनं बारामतीमध्ये उपोषण सुरू केलंय. या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
धनगर समाजाचा समावेश ST मध्ये करून आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी धनगर समाज चांगलाच आक्रमक झालाय. आरक्षणाचा विरोध करणा-या मधुकर पिचडांचा बारामतीमध्ये निषेध करण्यात आला. त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला.
बारामतीमध्ये सुरु असलेल्या आरक्षण कृती समितीच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे... काही उपोषणकर्त्यांची तब्येत खालावलीय. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 25 जुलैची मुदतही आज संपतेय.. आता सरकारनं दखल न घेतल्यास योग्य त्या भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशारा समीतीनं दिलाय. त्यामुळे आज आरक्षण कृती समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.