'राधे माँ'कडून जीवाला धोका, डॉली बिंद्राचा आरोप

स्वत:ला दुर्गा देवीचा अवतार म्हणणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ चर्चेत आहे. चारही बाजूंनी तिचेच किस्से ऐकायला मिळतायेत आणि सांगितले जात आहेत. पानाच्या दुकानापासून तर शॉपिंग मॉलपर्यंत जर चार लोकं एका ठिकाणी उभे असतील तर चर्चा राधे माँबद्दलच होतेय.

Updated: Aug 13, 2015, 04:57 PM IST
'राधे माँ'कडून जीवाला धोका, डॉली बिंद्राचा आरोप title=

मुंबई: स्वत:ला दुर्गा देवीचा अवतार म्हणणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ चर्चेत आहे. चारही बाजूंनी तिचेच किस्से ऐकायला मिळतायेत आणि सांगितले जात आहेत. पानाच्या दुकानापासून तर शॉपिंग मॉलपर्यंत जर चार लोकं एका ठिकाणी उभे असतील तर चर्चा राधे माँबद्दलच होतेय.

पण राधे माँवरील संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे. पहिले राधे माँची भक्त असलेली अभिनेत्री डॉली बिंद्रानं पोलिसांना पत्र लिहून तक्रार दाखल केलीय. डॉलीनं पोलिसांना सांगितलं की, राधे माँकडून तिच्या जीवाला धोका आहे. 

डॉली बिंद्रानं मालाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत सांगितलं की, काही दिवसांपासून तिला फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात येतेय. डॉलीनं राधे माँकडून तिच्या कुटुंबियांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस संरक्षणाची मागणी केलीय.

डॉलीनं सांगितलं राधे माँ आवडीनं चिकन खाते, घाणेरड्या शिव्याही देते. 10 ऑगस्टपासून सतत फोनवरून मारण्याची धमकी दिली जातेय. डॉली बिंद्रानुसार या फोनमागे राधे माँ आणि संजीव गुप्ता यांच्या कुटुंबियांचा हात असू शकतो. डॉली बिंद्रा कधी राधे माँची खूप मोठी भक्त होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.