पेपरमध्ये बांधलेल्या पदार्थांमुळे कॅन्सरला आमंत्रण

वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते ती हानीकारक असते. आणि त्यामुळे पदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्र टाळाण्याचं आवाहन केलं जातंय.

Updated: Dec 12, 2016, 06:10 PM IST
पेपरमध्ये बांधलेल्या पदार्थांमुळे कॅन्सरला आमंत्रण title=

मुंबई : वर्तमानपत्रात बांधून दिलेले पदार्थ हे भारतीयांच्या शरिरात हळूहळू विष पेरण्याचं काम करत असल्याचं एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय. 

प्रामुख्यानं रस्त्यावर जे पदार्थ मिळतात ते वर्तमानपत्रात बांधून दिले जातात. यामुळे कॅन्सरही होऊ शकतो, असं या संस्थेनं म्हटलंय. त्यामुळे पदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर टाळण्याची सूचना करण्यात येणार आहे.

वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते ती हानीकारक असते. आणि त्यामुळे पदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्र टाळाण्याचं आवाहन केलं जातंय.