मुंबई : पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या मुंबई मॅरेथॉनसाठी प्रॅक्टिस करताना मुंबईतले प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ राकेश सिन्हा यांचं निधन झालं. एडोस्कोपिक गायनाकॉलोजीचे राकेश सिन्हा प्रणेते होते. येत्या 11 तारखेला ते आपला साठावा वाढदिवस साजरा करणार होते. पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातला.
राकेश सिन्हांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंब आणि मित्रांमध्ये मोठ्या प्रमाणात आश्चर्य व्यक्त होताय. सिन्हा हे अत्यंत फिटनेस कॉन्शिअस असल्याचं सर्वज्ञात होतं. याआधी त्यांनी चार वेळा मॅरेथॉनपूर्ण केली होती.
गेल्याच महिन्यात त्यांनी स्वतःचं संपूर्ण चेकअपही करून घेतलं होतं. त्यातही त्यांना कुठलाही आजार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळेच राकेश सिन्हा यांच्या अचानक जाण्यानं मुंबईतल्या वैद्यक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.