तरूण उद्योजकांसाठी झी मीडियाचा नवीन शो
नई दिल्ली : तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्या व्यवसायला मार्गदर्शक बनविण्याचे तुमचे स्वप्न आहे. पण तुम्हांला हे माहिती नाही हे स्वप्न पूर्ण कसे करायचे तर घाबरू नका... झी मीडिया आता तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणार आहे. झी मीडिया तुमच्यासाठी डॉक्टर सुभाष चंद्रा शोची सुरूवात करणार आहे.
एक तासांच्या या कार्यक्रमात टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे दिग्गज डॉ. सुभाष चंद्रा आजच्या युवा पिढीशी संवाद साधणार आहे. आपले विचार त्यांच्याशी शेअर करणार आहे. डॉ. चंद्रा यांच्याशी ही बातचीत युवा उद्योजकांना मदत तसेच व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रेरणादायक ठरणार आहे.
देशातील सर्वात मोठं न्यूज नेटवर्क असलेल्या झी मीडियाचा ‘डॉक्टर सुभाष चंद्रा शो’ या आठवड्याच्या अखेरपासून सुरूवात होणार आहे. हा शो झी न्यूज चॅनलवर प्रत्येक शनिवारी रात्री १० वाजता आणि झी बिझनेस चॅनलवर सायंकाळी ७ वाजता दाखविण्यात येणार आहे. तर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम झी न्यूज आणि झी बिझनेसवर एकत्र प्रसारित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम झी मीडियाच्या इतर चॅनलवरही आपण पाहू शकतात.
आपल्या व्यवसायाची सुरूवात १७ रुपयांनी केल्यानंतर ३.५ अब्ज डॉलरचा एस्सेल ग्रुपचे साम्राज्य उभे करणारे डॉ. सुभाष चंद्रा भारतीय उद्योगातील एक अग्रणी व्यक्तींपैकी एक आहेत. व्यवसायाच्या दुनियेत स्वतःला सिद्ध करणारे डॉ. चंद्रा नव्या व्यवसायात आपली ओळख निर्माण करण्यात नेहमी आपली क्षमता दाखवली आहे.
व्यवसायातील नव्या उपक्रमांना यशाच्या शिखरावर नेहमी पोहचविले आहे. विचारांना वास्तविकतेत बदलण्यासाठी मोठ्या धाडसाची आणि प्रेरणेची गरज असते. वस्तूंचा व्यापार असो पॅकेजिंग इंडस्ट्रीची स्थापना, थीम पार्क्स किंवा मल्टीप्लेक्स उभारणे, भारतातील सर्वात मोठा आणि फायदेशीर टीव्ही मीडिया ग्रुप उभारणे आणि इंग्रजी वर्तमान पत्राची सुरूवात करणे असो डॉ. चंद्रा यांनी उद्योगातील सर्व उपक्रमांना यशाच्या शिखरावर पोहचविले आहे. आपल्या अनुकरणीय व्यवसायीक कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेले डॉ. चंद्रा नवा उद्योग सुरू करण्यात जराही मागेपुढे पाहत नाही.
या टीव्ही शो मध्ये डॉय चंद्रा देशातील नवोदित युवा उद्योजकांना आपल्या बेधडक आणि साहसी स्वभावाची ओळख करून देणार आहे. तसेच आपल्या व्यवसायाच्या रणनितींवर प्रकाश टाकणार आणि व्यवसायीक स्थितीवर आपले ज्ञान शेअर करणार आहे. या शोमध्ये डॉ. चंद्रा व्यवसायाची ठोस सुरूवात करणे आणि त्यासंदर्भातील आपले मत आणि प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.
हे डॉ. सुभाष चंद्रा यांचे व्हिजन होते की त्याने भारतात सॅटेलाइट टीव्ही इंडस्ट्रीज सुरूवात करण्यात मदत झाली आणि उद्योजकांना या दिशेने काम सुरू करण्यासाठी प्रेरित केले. डॉ. चंद्रा पहिले भारतीय आहे की ज्यांनी सॅटेलाइट टेलिव्हीजन चॅनल व्यवसायातील विशाल शक्यतांना ओळखून या दिशेने पाऊले टाकली. डॉ. चंद्रा यांनी भारतातील पहिले हिंदी सॅटेलाइट चॅनल झी टीव्हीसाठी कंटेट प्रोव्हाइडर म्हणून ऑक्टोबर १९९२मध्ये झी टेलिफिल्म्स लिमिटेडची सुरूवात केली. झी टीव्हीची सुरूवात होण्यापूर्वी भारतातील नागरिक सरकारी टेलिव्हीजन चॅनल दूरदर्शनवर अवलंबून होते.
स्वतःला व्यवसायासाठी तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे, हे समजण्यासाठी या शोची खूप मदत होणार आहे. तसेच विचारांचे धनी डॉक्टर सुभाष चंद्रांचा मूल्यवान सल्ला आणि मत तुम्हांला व्यवसायाल प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.