उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?

घरगुती वीज ग्राहकांना प्रस्तावित वीजदरवाढीचा शॉक देतानाच, औद्योगिक वीज ग्राहकांना मात्र वीजदर कपातीची भेट महावितरणनं देऊ केली आहे. राज्याचा औद्योगिक वीजदर कमी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. 

Updated: Feb 18, 2015, 10:45 AM IST
उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक? title=

मुंबई: घरगुती वीज ग्राहकांना प्रस्तावित वीजदरवाढीचा शॉक देतानाच, औद्योगिक वीज ग्राहकांना मात्र वीजदर कपातीची भेट महावितरणनं देऊ केली आहे. राज्याचा औद्योगिक वीजदर कमी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. 

उद्योगधंद्यांना चालना मिळावी या हेतूनं ही भूमिका, राज्य सरकारनं घेतली आहे. मात्र त्यामुळं ‘अच्छे दिन’चा दावा करणारं सरकार, सामान्य घरगुती वीजग्राहकांवर दरवाढीचा बोजा टाकायला कारण ठरल्याची भावना सामान्यांमध्ये आहे. 

महावितरणनं औद्योगिक ग्राहकांच्या वीजदरात ५ टक्के कपात सुचवली आहे. तर व्यापारी वीजदरात ३ टक्क्यांची कपात सुचवण्यात आलीय. महावितरणच्या या प्रस्तावावर १० मार्चला राज्य वीज नियामक आयोगाकडे सुनावणी होणार आहे. 

नेमकी कशी असेल ही दरवाढ पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून… 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.