कर्जमाफीच्या मुद्यावरून गोंधळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाण्यात

कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेलं.  कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग पाचव्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही आंदोलन केलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 10, 2017, 06:06 PM IST
कर्जमाफीच्या मुद्यावरून गोंधळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाण्यात title=

मुंबई : कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेलं.  कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग पाचव्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही आंदोलन केलं.

विधानभवनाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी रंगली. जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही तोपर्यंत सभागृहात कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विरोधकांबरोबरच सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही घेतली. त्यामुळं गोंधळात आणखीनच भर पडली. 

त्यामुळं विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. त्यामुळे अधिवेशनाचे सलग पाच दिवस पाण्यात गेले.