नालासोपाऱ्यात पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

नालासोपाऱ्यामध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आलीय. पीडित मुलगी काल रात्री साडे दहाच्या सुमाराला मामाच्या घरून जवळच असणाऱ्या तिच्या घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

Updated: Dec 10, 2014, 04:06 PM IST
नालासोपाऱ्यात पंधरा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार title=
संग्रहीत

मुंबई : नालासोपाऱ्यामध्ये एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आलीय. पीडित मुलगी काल रात्री साडे दहाच्या सुमाराला मामाच्या घरून जवळच असणाऱ्या तिच्या घरी जात होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

अल्पवयीन मुलगी घरी परत असताना पाच जणांनी तिला बाजुच्या बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत नेलं आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

याबाबत दोन जणांविरोधात पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अजुनही आरोपींना अटक होत नाही म्हणून नालासोपारा विरार लिंक रोडवर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.

अप्पर पोलीस अधिक्षकांच्या गाडीला घेराव घातला. 48 तासांत आरोपींना अटक करण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. पीडित मुलीवर मुंबईतल्या खासगी रूग्णालयात  उपचार सुरू आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.