www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रेल्वेविरोधात निष्काळाजीपणाचा गुन्हा दाखल करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहेत. मोनिका मोरेचा काही दिवसांपूर्वी घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघात झाला, अपघातात मोनिकाला आपले दोन्ही हात गमवावे लागले आहेत.
मात्र मोनिका मोरे हीचा अपघात तिच्या चुकीमुळेच झाला असं रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यावरून सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यातही रेल्वे प्रशासनानं दिरंगाई केली होती. घाटकोपर रेल्वे स्टेशनला मोनिका पडली त्या जागी प्लॅट फॉर्मला मोठा खड्डा असल्याचं सांगण्यात येत आहे.
मोनिका मोरे अपघात प्रकरणी आपण रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचंही आर आर पाटील यांनी म्हटलं आहे. या पूर्वी रेल्वेचे जीएम सूद यांनी मोनिकाला विशेष मदत देणं आपल्या हातात नसल्याचं म्हटलं होतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.