मुंबई : मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात दरेकरांसोबत शिवाजी नलावडे, राजा नलावडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरुन हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रविण दरेकर आता चांगलेच अडचणीत आले आहेत.
मनसेला सोडचिठ्ठी देत प्रविण दरेकर भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपची यामुळे अधिक डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. विरोधक याप्रकरणी भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
मुंबै बँकेत 'गोलमाल'
'झी २४ तास'ने घोटाळ्यांचा पर्दाफाश केलेल्या मुबैं बँकेची चौकशी होणार असल्याची घोषणा सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी याआधीच केली होती.
सहकार विभागामार्फत ही चौकशी होणार होती. मात्र मुंबै बँकेतल्या विविध घोळांची यापूर्वीच दोनदा सरकारनं चौकशी केली आहे. त्यामध्ये संचालक मंडळांना दोषी ठरवून संबंधितांकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. आता तर थेट गुन्हा दाखल झाल्याने काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.
मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. सरकारनं केवळ वेळकाढू धोरण अवलंबत पुन्हा एकदा टेस्ट ऑडीट सुरू केले होते. मात्र प्रत्यक्ष कारवाईच्या नावानं बोंबाबोंबच आहे. सरकारनं यावपूर्वीच्या अहवालांवर कारवाई करण्याचं सोडून आता पुन्हा चौकशीची घोषणा केल्यानं हा सर्व फार्स असल्याचं पुढं आले होते. आता गुन्हा दाखल झाल्याने याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.