लक्ष्मीला स्वीकारा म्हणणाऱ्या रावसाहेबांवर गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 29, 2016, 01:19 PM IST
लक्ष्मीला स्वीकारा म्हणणाऱ्या रावसाहेबांवर गुन्हा दाखल title=

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याचं लक्ष्मीदर्शनाचं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर दानवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य मतदारांना लाचखोरीला प्रवृत्त करणारं असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

मतदानाच्या एक दिवस आधीची संध्याकाळ महत्त्वाची असते. त्यावेळी लक्ष्मी घरात येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा, असं वादग्रस्त विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पैठण प्रचार सभेत केलं होतं.