मुंबईत देशातील पहिली सी-प्लेन सेवा सुरू

बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईमध्ये सी-प्लेन सर्व्हिस आज सुरू झाली. मुंबईकरांना आजपासून सी-प्लेनची भेट मिळाली आहे. मुंबईहून लोणावळ्यादरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबईहून लोणावळ्याचे अंतर अडीच ते तीन तासांवरून केवळ तीन मिनीट झाले आहे. 

Updated: Aug 25, 2014, 07:02 PM IST
मुंबईत देशातील पहिली सी-प्लेन सेवा सुरू title=

मुंबई : बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर मुंबईमध्ये सी-प्लेन सर्व्हिस आज सुरू झाली. मुंबईकरांना आजपासून सी-प्लेनची भेट मिळाली आहे. मुंबईहून लोणावळ्यादरम्यान ही सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबईहून लोणावळ्याचे अंतर अडीच ते तीन तासांवरून केवळ तीन मिनीट झाले आहे. 

या विमान सेवेचे पहिल्या विमानाने आज दुपारी १२ वाजता जुहू एरोड्रम येथून लोणावळ्यातील पवना धरणासाठी उड्डाण घेतले. 

आम्हांला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दैनंदिन आणि आठवड्याच्या फ्लाईट येत्या १५ सप्टेंबरपर्यंत आहे, असे मेहेयर कंपनीचे डायरेक्टर सिद्धार्थ वर्मा यांनी सांगितले. 

या सेवेसाठी मुंबईकरांचा मात्र खिसापाकीट हलका होणार आहे. सी प्लेनचा एकीकडचं भाडं सुमारे ३ हजार रुपये आहे. देशातील पहिली सी-प्लेन सर्व्हिस असून पहिला मार्ग मुंबई ते लोणवळा असा ठेवण्यात आला आहे. मेहेयरने महाराष्ट्र टुरिझमच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा सुरू केली. या सी-प्लेनचे नाव सेसना २०८ असे ठेवण्यात आले आआहे. हा हे विमान मुंबईहून लोणावळ्यात २६ मिनिटात पोहणार असून त्याचे लँडिंग पवना धरणात असणार आहे.

सेसना २०८  हे विमान ९ प्रवाशांना घेऊन जाऊ शकतो. याचे मुंबई ते लोणावळा भाडे २९९९ रुपये आहे.  लोणावळ्यानंतर ही सेवा शिर्डीला जोडण्यात येईल. त्यानंतर ऑक्टोबरपासून जूहू एऱोड्रम-गिरगाव चौपाटीहून ही सुविधा सुरू होणार आहे. त्यानंतर जुहू ते नरीमन पॉइंट १० ते १५ मिनिटात पोहचता येणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.