सरकारी नोकरीसाठी आता नवीन वयोमर्यादा

नोकरी करण्याऱ्यांसाठी सरकारने गुड न्यूज दिलेय. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आता वयाच्या मर्यदेत वाढ करण्यात आलेय. त्यामुळे तुम्ही ३३ व्या वयानंतर आता एजबार होणार नाहीत.  

Updated: Apr 23, 2016, 04:01 PM IST
सरकारी नोकरीसाठी आता नवीन वयोमर्यादा title=

मुंबई : नोकरी करण्याऱ्यांसाठी सरकारने गुड न्यूज दिलेय. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी आता वयाच्या मर्यदेत वाढ करण्यात आलेय. त्यामुळे तुम्ही ३३ व्या वयानंतर आता एजबार होणार नाहीत.  

५ वर्षांची वाढ 

नोकरीसाठी उमेदवारांच्या कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची वाढ करण्यात आलेय. आर्थिक टंचाईपायी सरकारी नोकर भरतीवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे नोकरीची संधी गमावण्याची शक्यता असलेल्यांना दिलासा मिळालाय. वयाची ३३ वर्षे पार करीत असलेल्या लाखो उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना मोठी संधी

सरकारी सेवेतील प्रवेशाच्या कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांनी वाढ केली आहे. त्यामुळे ३८व्या वर्षांपर्यंत सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येणार आहेत. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या ४३व्या वर्षांपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

राजकीय नेते लाभ घेणार?

जरी नोकरीच्य वयोमर्यादेत वाढ झाली तरी याचा लाभ राजकीय नेते उठवतील, अशी भीती व्यक्त होत आहे. सरकारी पदे भरताना आपल्या कार्यकर्त्यांची किंवा नातेवाईकांची वर्णी लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतील, अशीही चर्चा आहे.