अल्पवयीन शालेय मैत्रिणीवर मित्रासह तिघांकडून गॅंगरेप, व्हिडिओ व्हाट्सअॅपवर केला व्हायरल

एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रासह अन्य तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार झाल्यानंतर पीडित मुलीचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला. मुलीच्या काकीला या व्हिडिओची क्लिप व्हाट्सअॅपवर मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

PTI | Updated: Nov 27, 2015, 04:06 PM IST
अल्पवयीन शालेय मैत्रिणीवर मित्रासह तिघांकडून गॅंगरेप, व्हिडिओ व्हाट्सअॅपवर केला व्हायरल title=

मुंबई : एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्रासह अन्य तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बलात्कार झाल्यानंतर पीडित मुलीचा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला. मुलीच्या काकीला या व्हिडिओची क्लिप व्हाट्सअॅपवर मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

बलात्कारप्रकरणी अल्पयीन चारही जणांना कोठडी देण्यात आल्याची माहिती डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी दिली. त्यांना रिमांड होममध्ये पाठविण्यात आले आहे.

बलात्कार प्रकरणातील मुले ही दहावी आणि नववीतील आहेत. त्यांनी आपल्याच १५ वर्षीय मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. ही घटना ८ नोव्हेंबर रोजी घडली. याची व्हिडिओ क्लिप करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत वाच्यता केल्यास पीडित अल्पवयीन मुलीला या मुलांकडून धमकी देण्यात येत होती. तू जर कोणाला सांगितलेस तर तुझा व्हिडिओ ऑनलाइन शेअर करु, असे धमकविण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस इन्सपेक्टर शशांक सांडभोर यांनी दिली.

बलात्काराचा व्हिडिओ आधी ऑनलाइन टाकला नंतर या मुलांनी तो व्हाट्सअॅपवर व्हायरल केला. त्यानंतर पीडित मुलीच्या काकीला याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कृत्य केल्याचे मान्य केले. मालाड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही मुलांना डोंगरी येथील रिमांड होममध्ये पाठविण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.