सोन्याचे भाव आणखी किती वाढणार?

सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Updated: Nov 9, 2016, 09:39 AM IST
सोन्याचे भाव आणखी किती वाढणार? title=

मुंबई : सोन्याचा भाव काही तासात प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. ३० हजार प्रतितोळा वरून सोने ३४ हजार प्रतितोळावर गेला आहे. मात्र सोन्याचा भाव आणखी ३८ हजारावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सुरूवातीला ५०० आणि हजाराच्या नोट चलनातून बाद केल्याने सोन्याचे भाव वाढल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र ही वाढ जगरात दिसून येत आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाकडे सुरू असेलली विजयी घोडदौड असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यामागील कारण अजून तरी स्पष्ट झालेलं नाही.

आशिया खंडात मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव वाढले असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात प्रतितोळा ४ हजाराची वाढ झाली आहे.