गूड न्यूज: राज्यात आजपासून ‘ब्लड ऑन कॉल’

रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त मिळालं तर त्याचे प्राण वाचू शकतात. पण अनेकदा आवश्यक गटाचं रक्त मिळवताना बरीच धावपळ करावी लागते. आता या धावपळीतून सुटका होणार आहे. फक्त १०४ क्रमांक डायल केल्यावर मोटरसायकलवरून रुग्णापर्यंत रक्त पोहोचवणारी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होतेय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 7, 2014, 06:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त मिळालं तर त्याचे प्राण वाचू शकतात. पण अनेकदा आवश्यक गटाचं रक्त मिळवताना बरीच धावपळ करावी लागते. आता या धावपळीतून सुटका होणार आहे. फक्त १०४ क्रमांक डायल केल्यावर मोटरसायकलवरून रुग्णापर्यंत रक्त पोहोचवणारी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होतेय.
सार्वजनिक आरोग्य विभागानं प्रायोगिक तत्त्वावर सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली होती. तिथं ती यशस्वी झाल्यानं उद्यापासून मुंबईसह राज्याच्या अन्य ३३ जिल्ह्यांमध्ये ती सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी पुण्यात विशेष कॉल सेंटर बनवण्यात आलंय. १०४ क्रमांकावर केलेला फोन या कॉल सेंटरमध्ये जाईल आणि नंतर तिथून संबंधित जिल्ह्यातील रक्तपेढीला सूचना दिल्या जातील.
रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयापर्यंत शासकीय रक्तपेढीतून मोटरसायकलवरून रक्तपिशव्या पोहोचवल्या जातील. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यानं ही योजना राबवली जाणार आहे. प्रत्येक मोटरसायकलला दर महिन्याला ३ हजार किलोमीटरचा टप्पा ठरवण्यात आला आहे. त्यासाठी दरमहा १६ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ३ हजारवरील प्रत्येक किलोमीटरला ४ रुपये दिले जाणार आहेत, असं आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यारनं सांगितलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.