www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी... आता सीएसटी स्टेशनवर लोकलच्या प्लॅटफॉर्मवरुन लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आता तंगडतोड करण्याची गरज नाही. एक नवा ब्रीज सीएसटीवर तयार होतोय. तब्बल अठरा प्लॅटफॉर्मसना हा ब्रीज जोडणार आहे.
सीएसटी स्थानकावर सध्या एका मोठ्या फुट ओव्हर ब्रीजचं काम जोरात सुरु आहे. सीएसटी स्थानकाच्या उत्तर बाजूला म्हणजेच मस्जिद स्थानकाच्या दिशेनं काम सुरु आहे. या फुट ओव्हर ब्रीजचं वैशिष्ट्य म्हणजे सीएसटीवरील सर्वच्या सर्व प्लॅटफॉर्म म्हणजेच १८ प्लॅटफॉर्म या ब्रीजनं जोडले जाणार आहेत. या ब्रीजची लांबी तब्बल २७० मीटर एवढी आहे. मध्य रेल्वेवरील हा सर्वात मोठा फुट ओव्हर ब्रीज ठरणार आहे. या ब्रीजमुळं लोकलचे प्लॅटफॉर्म आणि मेल-एक्सप्रेसचे प्लॅटफॉर्म थेट जोडले जाणार आहेत.
एक महिन्यापूर्वी या ब्रीजचं काम सुरु झालं असून १५ एप्रिलपर्यंत काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. विशेषतः प्लॅटफॉर्म नंबर १५,१६,१७ आणि १८ प्लॅटफॉर्म हे थेट लोकल प्लॅटफॉर्मशी जोडले गेल्यानं प्रवाशांची होणारी तंगडतोड थांबणार असून २०-२५ मिनिटंही सहज वाचणार आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.