ट्रान्स हार्बर लिंकला हिरवा झेंडा; मुंबईची नवी ओळख

देशातला दुसरा समुद्र मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)साठी सरकारकडून हिरवा झेंडा मिळालाय. या योजनेचा काम जानेवारी २०१३ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 23, 2012, 01:06 PM IST

www.24taas.com, मुंबई
देशातला दुसरा समुद्र मार्ग मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल)साठी सरकारकडून हिरवा झेंडा मिळालाय. या योजनेचा काम जानेवारी २०१३ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईत राजीव गांधी बांद्रा-वरळी सी लिंकनंतर अरबी समुद्रात बांधला जाणारा हा दुसरा आणि देशातील सर्वात लांब म्हणजेच तब्बल २२ किलोमीटर लांब पूल असणार आहे. एमटीएचएल किंवा शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा मार्ग २०१७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी तब्बल ९,६३० करोड रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)चे संयुक्त योजना अध्यक्ष डी कवथकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल म्हणजेच सोमवारी या योजनेला मंजूरी दिलीय. दक्षिण मुंबईच्या शिवडीपासून सुरू होणारा सहा लेन असलेला हा समुद्र मार्ग ठाण्यातून मार्गक्रमण करत रायगड जिल्ह्यातील न्हावा शिवा क्षेत्रातील चर्ली गावापर्यंत पसरलेला असेल.
पुढच्या दोन-तीन महिन्यात औपचारिक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०१३ पर्यंत या प्रकल्पावर काम सुरू होण्याची शक्यता कवथकर यांनी वर्तवलीय.