आदर्श प्रकरण : अशोक चव्हाणांना मुंबई हायकोर्टाचा दणका

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. आरोपपत्रातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. 

Updated: Mar 4, 2015, 01:48 PM IST
आदर्श प्रकरण : अशोक चव्हाणांना मुंबई हायकोर्टाचा दणका title=

मुंबई : आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. आरोपपत्रातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास हायकोर्टानं नकार दिलाय. 

अशोक चव्हाणांचं नाव आरोपपत्रातून वगळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती मात्र तुम्हाला यापूर्वी बराच वेळ दिलाय असं म्हणत हायर्कोटानं ही याचिका फेटाळली.

नुकत्याच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेल्या अशोक चव्हाणांच्या अडचणीत यामुळे आता चांगलीच वाढ होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीही चव्हाणांचे नाव चार्जशीटमधून वगळण्यासंदर्भात हायकोर्टाने नकार दिला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.