विमान अपहरणाचा फोन, दोन तास पळापळ!

मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या जेट एअरलाईन्सच्या विमानातील प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले. विमान अपहरण करणार असल्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 22, 2012, 09:24 PM IST

www.24taas.com,मुंबई
मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या जेट एअरलाईन्सच्या विमानातील प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले. विमान अपहरण करणार असल्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
प्रवाशांना खाली उतरविण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. सुरक्षेची खात्री झाल्यानंतर दोन तास उशिराने विमानाचे उड्डाण झाले.
या विमानाचे अपहरण करणार असल्याची धमकी देणारा फोन गुप्तचर संस्थेला दुपारी ३.४० च्या दरम्यान आला होता. हे विमान ४ वाजून १० मिनिटांनी बंगळूरूसाठी उड्डाण घेणार होते. त्यामुळे अर्धातास अगोदर मिळालेल्या या धमकीमुळे विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी विमानाचा ताबा घेत चौकशी केली. या विमानात जवळपास ५० प्रवाशी आणि कर्मचारी होते. या अलर्टमुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागला मात्र, तपासात अधिका-यांना काहीही सापडले नाही.
नुकतेच तिरुअनंतपूरम विमानतळावरही एअर इंडियाच्या पायलटकडून अपहरणाचा अलर्ट मिळाल्यानंतर सुरक्षा रक्षकांसह सर्वांची धावपळ झाली होती.