बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज

बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदाही उशीरा लागण्याची शक्यता आहे. कारण मागण्या मान्य न झाल्यामुळं शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. 

Updated: Feb 11, 2016, 08:53 PM IST
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज  title=

मुंबई : बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदाही उशीरा लागण्याची शक्यता आहे. कारण मागण्या मान्य न झाल्यामुळं शिक्षकांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. 

परीक्षक दररोज केवळ एकच पेपर तपाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेनं दिलाय. त्यामुळं बारावीची परीक्षा पुन्हा चर्चेत आलीय.

 येत्या ८ दिवसात शासनानं संघटनेबरोबर चर्चा करून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास १२ वी परीक्षेचे पेपर तपासण्याबाबर असहकार आंदोलन करण्यात येणार आहे. 
 
 परीक्षा मात्र सुरळीत पार पाडणार असल्याचंही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय.  आमच्या मागण्यांबाबत शासनानं तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात  येईल असा इशाराही संघटनेनं दिलाय.