गडकरींच्या `पूर्ती`ची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबईत १२ ठिकाणी `पूर्ती` कंपनीच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येतेय. पूर्तीमध्ये गुंतवणूक करणा-या कंपन्यांचाही तपास केला जातोय. तसंच कंपन्यांच्या नव्या - जुन्या पत्यांचीही तपासणी केली जातेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 30, 2012, 10:56 PM IST

www.24taas.com,मुंबई

मुंबईत १२ ठिकाणी `पूर्ती` कंपनीच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येतेय. पूर्तीमध्ये गुंतवणूक
करणा-या कंपन्यांचाही तपास केला जातोय. तसंच कंपन्यांच्या नव्या - जुन्या पत्यांचीही तपासणी केली जातेय.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतंच पूर्तीवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ही आयकर विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्हींमध्ये काही दुवा आहे का ? अशीही शंका व्यक्त केली जातेय.
नितीन गडकरींनी शेतकऱ्यांची जमीन लाटली असा गौप्यस्फोट करून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमने राजकीय वातावरण तापविले. गडकरींनीही आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं.
गडकरींच्या पूर्ती ग्रुपमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची प्रकरण रोजरोज बाहेर येऊ लागल्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली होती. पूर्ती ग्रुपमध्ये १९ बेनामी कंपन्या आणि त्यांचे पत्ते मुंबईतील झोपडपट्टीत असल्याचं समोरं आलं. मात्र तरी सुद्धा संघाने आरोपांचे खंडन करीत गडकरींच्या चुका माफ केल्यात.