हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक

स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप इंद्राणीवर आहे.

Updated: Aug 26, 2015, 10:24 AM IST
हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक  title=

मुंबई : स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप इंद्राणीवर आहे.

इंद्राणी मुखर्जी ही इंद्राणी मुखर्जी स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जींची पत्नी आहे. इंद्राणी स्वत: आयएनएक्स मीडिया आणि न्यूज समूहाची माजी सीईओ आहे.

इंद्राणी हिची सख्खी बहिण शीना बोरा हिचा २०१२ साली खून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिना हिचा मृतदेह मुंबईपासून ८४ किलोमीटर दूर रायगड जिल्ह्यातील एका जंगलात पुरला होता.

शिनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिला अटक केलीय. याप्रकरणी इंद्राणीला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.


फाईल फोटो

कसा झाला खुलासा
इंद्राणी मुखर्जी यांच्या ड्रायव्हरला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यानं आपलं तोंड उघडलं... आणि या खुनाबद्दल काही धक्कादायक खुलासे केले. या प्रकरणात इंद्राणीचाही सहभाग असल्याचं त्यानं म्हटलंय. तसंच शिनाचा मृतदेह कुठे पुरला ती जागाही त्यानं पोलिसांना दाखवलीय. 

कोण आहे इंद्राणी मुखर्जी 

  • INX मीडिया आणि INX न्यूजच्या माजी सीईओ

  • इंद्राणीनं २००२ पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केलं

  • हे पीटर यांचं दुसरं लग्न होतं

  • २००० मध्ये इंद्राणी आणि पीटर यांनी आयएनएक्स मीडिया सोडलं

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.