'मोदी रामापेक्षा मोठे आहेत का?'

जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Updated: Dec 22, 2016, 06:54 PM IST
'मोदी रामापेक्षा मोठे आहेत का?' title=

मुंबई : जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान राम मंदिर रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा पार पडला. पण या उद्घाटन सोहळ्यावेळी शिवसेना आणि भाजपमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.

या उदघाटन सोहळ्यात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी रंगली. पंतप्रधान मोदी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणाबाजीने काही काळ गोंधळ माजला होता. दरम्यान यावर संतप्त होऊन दिवाकर रावते यांनी मोदी हे रामापेक्षा मोठे आहेत का असे विचारत भाषण अर्धवट सोडून दिले तर याच गोंधळामुळे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही आपल भाषण दोन मिनिटात आटोपते घेतले.