लोकशाहीचा काळाबाजार झाला : कुमार सप्तर्षी

  महाराष्ट्राच्या सदनात आवाजी मतदानाने भाजपने बहूमत सिद्ध केलं, हे म्हणजे लोकशाहीचा काळाबाजार असल्याची जळजळीत टीका ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली आहे.

Updated: Nov 12, 2014, 03:07 PM IST
लोकशाहीचा काळाबाजार झाला : कुमार सप्तर्षी title=

मुंबई :  महाराष्ट्राच्या सदनात आवाजी मतदानाने भाजपने बहूमत सिद्ध केलं, हे म्हणजे लोकशाहीचा काळाबाजार असल्याची जळजळीत टीका ज्येष्ठ विचारवंत आणि राजकीय विश्लेषक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली आहे.

ही अत्यंत व्यथित करणारी घटना आहे. ही अशूभ सूचक घटना आहे. हे सरळ सरळ मॅन्युप्यलेशन आहे. लहानपणी एक कविता होती, शेणाचे घर आणि मेणाचे घर... ही शेणाची आणि मेणाची सत्ता आहे. ही कधी कोसळू शकते. नाही कोसळली तर सबंध लोकशाहीला धोका आहे. काहीही करून सत्ता टिकवावी, असे झाले तर याचे टोक जाते हुकूमशाहीकडे असे सप्तर्षी यांनी व्यक्त केले.

जोपर्यंत लोक आपल्यासोबत आहे, तोपर्यंत लोकशाही... लोक आपल्यासोबत नाही, तेव्हा हुकूमशाही असं चित्र निर्माण होण्याचं बीज आजच्या घटनेतून पेरलं गेलं आहे. त्यामुळे तशी ही निषेधार्ह घटना आहे. विश्वासदर्शक ठराव काठावर का होईना मंजूर होणार हे माहीत होते. मग मतविभाजन का केले नाही असा सवालही सप्तर्षी यांनी उपस्थित केला.

पाहा काय म्हणाले सप्तर्षी (व्हिडिओ)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.