आयटीची करडी नजर, फास आवळण्याची तयारी सुरू

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात आयकर विभागाची नाशिकमधल्या अनेक प्रतिष्ठितांवर नजर आहे. 

Updated: Dec 12, 2016, 06:28 PM IST
आयटीची करडी नजर, फास आवळण्याची तयारी सुरू title=

नाशिक : कोट्यवधींच्या नोटा बदलणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. ताब्यात घेण्यात आलेले दोघेही राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. 

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसात आयकर विभागाची नाशिकमधल्या अनेक प्रतिष्ठितांवर नजर आहे. 

सूरतमध्ये चार जणांना पकडण्यात आलं होतं. त्यापार्श्वभूमीवर राज्यभरातले आयकर विभागाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.  

दोन हजार रुपयांच्या नोटा सर्वसामान्य नागरिकांना मिळत नसल्याने नाशिक औरंगाबाद विभागातील आयकर अधिकारी सतर्क झालेत. प्रलोभनाच्या जाळ्यात अडकवून अनेक मोठे मासे गळाला लागताहेत. 

राजकीय पक्षांशी संबंधित दोन जणांना आयकर विभागाने रात्री महामार्गावरील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे आठ लाखांच्या आसपास नवीन नोटा मिळाल्याने आयकर विभागाने संबंधित बँकाकडे आपला मोर्चा वळवलाय.