<b><font color=#3CC3BE>नोकरीची संधी:</font> महावितरणमध्ये २००० पदांची भरती</b>

राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यकांची तब्बल दोन हजार पदं भरण्यात येणार आहेत. त्याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्यानं ग्रामीण भागातील उपकेंद्र सहाय्यकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 9, 2014, 10:55 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महावितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यकांची तब्बल दोन हजार पदं भरण्यात येणार आहेत. त्याची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्यानं ग्रामीण भागातील उपकेंद्र सहाय्यकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.
राज्यभर कार्यक्षेत्र असलेल्या महावितरणमध्ये अनेक पदे रिक्त असल्यानं उपलब्ध असलेल्या उपकेंद्र सहाय्यकांवर मोठा ताण येत असून त्यांना जादा तास काम करावं लागत आहे. तसंच ग्राहकांनाही समाधानकारक सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडं आल्या आहेत. त्या पार्श्वनभूमीवर महावितरणनं नव्यानं उभारलेल्या उपकेंद्रांसाठी उपकेंद्र सहाय्यकांची दोन हजार पदं भरण्याचा निर्णय प्रशासनानं घेतल्याचं महावितरणचे सांघिक संवाद अधिकारी राम दुतोंडे यांनी सांगितलंय. तसंच महावितरणमध्ये कनिष्ठ सहाय्यकांची ७०० पदं भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
पात्रता
> उमेदवार दहावी पास असावा.
> आयटीआय इलेक्ट्रीशियन किंवा आयटीआय वायरमनचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
> उमेदवार महाराष्ट्राचा पंधरा वर्षांपूर्वीपासूनचा रहिवासी असावा.
महावितरणमध्ये केल्या जाणार्या भरतीमध्ये संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी (डोमिसाईल) असावा अशी अट पूर्वीपासूनच आहे. मात्र काही उमेदवार डोमिसाईलच्या कालावधीत फेरफार करून प्रमाणपत्र सादर करून भरती होत असल्याचं अनेक वेळा पुढं आलंय. त्या पार्श्ववभूमीवर नव्यानं होणार्याक या भरतीत डोमिसाईल प्रमाणपत्राची कसून तपासणी करण्यात येणार असल्याचंही राम दुतोंडे यांनी सांगितलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.