मुंबई : मुंबईत जुहू चौपाटीवर जेली (स्टिंगरे) फिशनं १७ जणांना चावा घेतलाय. विसर्जनावेळी हा मासा १७ जणांना चावलाय. जखमी गणेशभक्तांवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जहू चौपारटीवर मोठी गर्दी उसळली होती. याचवेळी जेली फिशनं १७ जणांना चावा घेतला. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये घबराटीचे वातावरण होते.
समुद्रावर जाताना स्टिंगरे माशापासून सावधानता बाळगा असे आवाहन झी मीडियाकडून करण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.