मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय - हुसैन

१९९३मधील मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या शाहनवाझ हुसैन यांनी दिली आहे.

Updated: Jul 30, 2015, 09:32 AM IST
मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय - हुसैन title=

मुंबई : १९९३मधील मुंबई बॉम्बस्फोटातील मृतांना अखेर न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या शाहनवाझ हुसैन यांनी दिली आहे.

दोषी याकूब मेमन याला सकाळी सात वाजता फासावर लटकवल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था सगळ्यांसाठी समान असते, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केली आहे.  

दरम्यान, याकूब मेमनला फासावर लटकवल्यानंतर मुंबईतही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईच्या आग्रीपाड्यातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.