दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई: मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फाशीची शिक्षा योग्यच असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
आताच सर्व उपटसूंभ जागे झालेत का? माझ्या मते सलमान मूर्ख असेल पण बाकीच्यांना कळत नाही का? नसिरुद्दीन शाह आणि इतर मंडळींना महाराष्ट्रातील बाकी प्रश्न कधी दिसले नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
न्यायालयीन प्रक्रिया संथ असल्यानं या विषयावर राजकारण होतंय. सलमान मूर्ख असला तरी इतर 250 तर विद्वान होते. राम जेठमलानी यांच्या सारख्यानी फाशी रद्द करण्याबाबत विनंती करणं किती योग्य आहे, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
याकूबवरील ट्विटनंतर सलमान खानवर टीका होत असतांना सलमानसोबत जवळचे संबंध असणाऱ्या राज ठाकरेंची काय प्रतिक्रिया असेल याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.
त्यावर बोलतांना राज ठाकरे म्हणाले, मी सलमानला नाही तर त्याच्या कुटुंबियांना भेटायला गेलो होतो. सलीम खान यांना भेटायला गेलो, त्यांचे माझे कौटुंबिक नातं असल्यानं ते माझं कर्तव्य होतं.
सलमान खानवर रागवत राज म्हणाले, "सलमानच्या ट्वीटबाबत त्यानं माफ़ी वडिलांच्या सांगण्यावरून मागितली आता ट्वीटही त्यांना विचारुन करत जावं."
ओवेसी भिकार आणि सलमान मूर्ख
सगळं चांगलं चाललं असतांना (बजरंगी भाईजान) वातावरण खराब कसं करायचं हे सलमानकडून शिकावं, असा टोला राज ठाकरेंनी सलमानला हाणला.
तर याकूबच्या फाशीचा सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतरही त्याला सहानुभूती दखावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, राज ठाकरेंनी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.