कुमार केतकरांची शिवसेनेवर टीका

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. याच बरोबर शिवसेनेलाही केतकरांनी जाब विचारला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 20, 2013, 08:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सरकारवर टीका केली आहे. याच बरोबर शिवसेनेलाही केतकरांनी जाब विचारला आहे.
`तुमचा गांधीजी करू` अशी धमकी दाभोलकरांना मिळाली होती. मात्र तरीही त्यांना सुरक्षा देण्यात आली नाही. त्यांना संरक्षण देणं ही शासनाची जबाबदारी होती, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी दिली आहे.
याचबरोबर शिवसेनेलाही कुमार केतकरांनी जाब विचारला आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी कायम अंधश्रद्धेवर आसूड ओढले. मात्र त्यांचा वारसा सांगणारी शिवसेना अंधश्रद्धा निर्मुलन विधेयकाला विरोध करते, या विरोधाभासावर कुमार केतकरांनी बोट ठेवलं.
केतकरांप्रमाणेच ‘गांधीजींची हत्या करणारी शक्तीच दाभोलकरांची मारेकरी आहे’, असं वक्तव्य मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.