महिलांसाठी आता खास `बेस्ट` बस...

महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड आणि विनयभंगासारख्या घटना लक्षात घेता मुंबई बेस्टने आता महिलांच्या सुरक्षेसाठी नवं पाऊल उचललं आहे.

Updated: Jan 1, 2013, 05:18 PM IST

www.24taas.com, मुंबई
महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड आणि विनयभंगासारख्या घटना लक्षात घेता मुंबई बेस्टने आता महिलांच्या सुरक्षेसाठी नवं पाऊल उचललं आहे. मुंबईत बेस्टनं महिलांसाठी विशेष बस सेवा सुरु केली आहे.
गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात होतात. रेल्वे स्टेशन, बस यासारख्या गर्दीच्या ठिकाणी महिलांना नको त्या प्रकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे महिलांचा हा त्रास कमी होण्यासाठी बेस्टने ही नवी योजना सुरू केली आहे.

अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते या नवीन सेवेचं उदघाटन झालं. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला. गोरेगाव ते चिंचोली बंदर, मालाड असा मार्ग आहे. या महिला स्पेशल बसमध्ये सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आलीये.