पर्यावरणाच्या जणजागृतीसाठी शिकली हिंदी

अमेरिकेतले चार मित्र आपल्या बॉलीवूडच्या छैया-छैया अश्या गाण्यांवर मुलांना थिरकवत सोलर उर्जेचे महत्व पटवून सांगत आहेत. सध्या भारत दौ-यावर असलेले हे 4 मित्र धुळे मुक्कामी आहे.  मुलांना मनोरंजनातून पर्यावरण साक्षर बनवत आहेत.

Updated: Dec 9, 2015, 09:05 PM IST
पर्यावरणाच्या जणजागृतीसाठी शिकली हिंदी title=

धुळे : अमेरिकेतले चार मित्र आपल्या बॉलीवूडच्या छैया-छैया अश्या गाण्यांवर मुलांना थिरकवत सोलर उर्जेचे महत्व पटवून सांगत आहेत. सध्या भारत दौ-यावर असलेले हे 4 मित्र धुळे मुक्कामी आहे.  मुलांना मनोरंजनातून पर्यावरण साक्षर बनवत आहेत.

पाहा व्हिडिओ बातमीच्या शेवटी

अमेरिकेतील सोलर पंच ऑर्केस्ट्रा सध्या धुळ्यात धूम करीत आहे. सौर उर्जेचा प्रचार आणि प्रसार करणे आणि पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करणे या हेतूने अलान बिगलो, जेम्स डिन् या दुकलीने २००७ मध्ये सोलर पंच या नावाने  ऑर्केस्ट्रा सुरु केला. त्या नंतर त्यांना अन्ड्रू मार्टिन आणि उकेलेले हे दोघे सामील झाले.

सध्या हे चोघे जगभरात फिरून सौर उर्जा आणि पर्यावरणावर जनजागृती करतात. त्यांचा ऑर्केस्ट्रा हा संपूर्णपणे सौर उर्जेवर चालतो.  जगभरात सौर उर्जा वापरून ऑर्केस्ट्राचे शेकडो प्रयोग यांनी केले आहेत. सौर उर्जेचा वापर, प्लास्टिक विरोधी जनजागृती आणि इतर पर्यावरणाशी संबंधित विषयांवर हे संगीत प्रयोग होतात. भारतात ऑर्केस्ट्रा करण्यासाठी अलन याने न्यूयार्कमध्ये क्लास लावून हिंदी शिकून घेतली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.