विधान परिषदेसाठी सेनेचे देसाई, भाजपकडून जानकरांना संधी

विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. भाजपनं देखील आपले उमेदवार निश्चित केलेत. मात्र त्यांची नाव अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलीत.

Updated: Jan 20, 2015, 09:06 AM IST
विधान परिषदेसाठी सेनेचे देसाई, भाजपकडून जानकरांना संधी title=

मुंबई : विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणा-या निवडणुकीत शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. भाजपनं देखील आपले उमेदवार निश्चित केलेत. मात्र त्यांची नाव अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलीत.

भाजपच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना वि. परिषदेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. तर विनायक मेटेंनी १० महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ज्या जागेचा राजीनामा दिला होती, तीच जागा त्यांना पुन्हा दिली जाणार आहे. १० महिन्यानंतर पुन्हा मेटेंच्या आमदारकीचं बघू, अशी भाजपची भूमिका असल्याचं समजतं.

तर आंदोलनाचा पवित्रा मागे घेण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार नसल्यानं त्यांच्यापैकी कुणालाही विधान परिषदेची उमेदवारी मिळणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.