कॅन्सरग्रस्तांना २५ लाखांची मदत देणार - महाराष्ट्र भूषण पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज प्रदान केला जाणार आहे. राजभवनात हा सोहळा पार पडणार आहे. 

Updated: Aug 19, 2015, 08:10 PM IST
कॅन्सरग्रस्तांना २५ लाखांची मदत देणार - महाराष्ट्र भूषण पुरंदरे title=

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार आज प्रदान केला जातोय. राजभवनात हा सोहळा पार पडणार आहे. १० लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. राज्यपालांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. या रकमेतले केवळ 10 पैसे आपण घेणार असून पुरस्काराचे 10 लाख आणि पदरचे 15 लाख अशी एकूण 25 लाखांची मदत कॅन्सरच्या रुग्णांना मदत म्हणून दिली जाईल, अशी घोषणा यावेळी शिवशाहिरांनी केलाय.

यावेळी, मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या... 

'महाराष्ट्र भूषण' शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
- चर्चा, चिकित्सा, मनोद्य, मूल्यांकन या सगळ्या गोष्टी इतिहास लेखनात मीही केल्या
- मी वाट पाहत होतो यावर लेखकांच्या काही प्रतिक्रिया येतात का?
- एका मासिकासाठी लिहिलेल्या या नऊ लेखांसाठी वाचकांचं एकही पत्र नव्हतं
- तेव्हा लक्षात आलं मासिकांच्या संपादकांनीही हे लेख वाचले नव्हते
- शिवचरित्र हे लेकींच्या गर्भापर्यंत जायला पाहिजे
- अपील होणारी शैली शाहिरी, त्यामुळे मी ही शैली वापरली  
- लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलं
- अहंकाराचा वारा लागला नाही, लागू देणार नाही
- ज्ञानेश्वरीच्या प्रेरणेतून शिवचरित्र लिहिलं
- सोप्या शब्दांत शिवचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला
- ललित लेखकाला अधिक अभ्यास करायला हवा
- जास्तीत जास्त अभ्यास करा... त्यातूनही काही चुकलं... तर दुरुस्त करा... ते आपलं कर्तव्यच आहे
- या पुरस्कारामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढलीय
- हे भूषण पेलण्याची जबाबदारी मोठी आहे 
- मंगेशकर रुग्णालयाला 25 लाखांची मदत देणार
- मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करणार
- या रकमेतली केवळ 10 पैसे मी घेणार आहे... 
- तारुण्य, संपत्ती आणि सत्ता यांचा अहंकार कुणीच धरू नये
- इतिहास हे मोलाचं धन आहे... ती सरस्वतीही आहे आणि लक्ष्मीही... तिचा अपमान नको
- पुरस्काराचे 10 लाख आणि पदरचे 15 लाख अशी एकूण 25 लाखांची मदत कॅन्सरच्या रुग्णांना मदत म्हणून दिली जाईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- बाबासाहेबांनी गेली 75 वर्षात संपूर्ण राज्यातच नाही तर देशात 
- हा आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा क्षण
- महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जाणारा सर्वोच्च नागरिक पुरस्कार बाबासाहेबांना दिला जातोय याचा आनंद
- बाबासाहेबांमुळे या सन्मानाचं महत्त्व अधिकच वाढलं
- कुणाच्या भितीनं हा कार्यक्रम राजभवनात घेण्यात आलेलं नाही
- देशाचे सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपती भवनात होतात, त्याच धर्तीवर आम्ही हा पुरस्कार राजभवनात घेण्याचा निर्णय घेतला... राज्याचे प्रमुख म्हणू राज्यपालांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम घेतला
- राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण 'जाणता राजा'च्या प्रयोगाने केले
- छत्रपतींच्या खऱ्या सेवकाला सन्मानित करण्यात येतंय, याचा अभिमान
- वाद घालणाऱ्यांना छत्रपती शिवराय समजलेच नाहीत 
- छत्रपती आज असते तर त्यांचा कडेलोट छत्रपतींनी केला असता
- छत्रपतींचं व्यवस्थान शास्त्राचा आणि कौशल्याचा राज्य सरकारवर प्रभाव असेल
- छत्रपतींचे अनेक गुण आजही दुर्लक्षित, या गुणांवर चित्रपट काढावा
- या विषयावर जे कुणी चित्रपट काढतील त्यांना सरकार निधी आणि पाठिंबा देईल 

विनोद तावडे
- हायकोर्टाची बाबासाहेबांच्या कामाला पोचपावती
- बाबासाहेब पुरंदरेंमुळेच महाराजांचा इतिहास आम्हाला समजला
- मी मराठा आहे म्हणून बाबासाहेबांवर प्रेम करायचं नाही का?, तावडेंचा सवाल
- बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातोय याचा अभिमान

सुभाष देसाई 
- बाबासाहेबांनी लिहिलेला इतिहास वाचतच महाराष्ट्रातील चार पिढ्या मोठ्या झाल्या
- पुरस्कारविरोध हा माकड चेष्टा - देसाई

 

दरम्यान, वादाच्या पार्श्वभूमीवर राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सेना-भाजपचे सर्व मंत्री आणि आमदारांसोबतच मंगेश पाडगावकर, दिलीप वेंगसरकर हे देखील या सोहळ्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत.  

बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पावलं उचललीत. राष्ट्रवादीच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी कलम १४९ नुसार नोटिसा बजवल्यात. 

तर कळवा नाक्यावर जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणाबाजीही केली. त्यामुळे, पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला होता.  

दुसरीकडे, ठाण्यात बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी परवानगी मागितली होती. पण, यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.