मुंबई : अंधेरी येथील लिंग रोडवर लोटस बिझनेस पार्कमध्ये 21 व्या मजल्यावर भीषण आग लागली ही आग जोरदार वाऱ्यामुळे अधिक भडकली आहे. तर अग्निशमन दलाचे काही जवान इमारतीत अडकले होते. त्यांना हेलिकॉप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात आले. मात्र, अडकलेल्या एका जवानाचा मृत्यू झाला. आणखी काही अडल्याची भीती व्यक्त होत आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि 12 पाण्याचे टॅंकर घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, वाऱ्यामुळे आग अधिकच भडकली आहे. त्यामुळे 21 व्या मजल्यावरची आग 22 व्या मजल्यावर पसरली आहे. आगीमुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझविणाऱ्या जवानांपैकी एका जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शासकीय यंत्रणा सक्षम नसल्याने मदतकार्य पोहोचण्यास उशीर झाल्याने हा बळी गेलाय. पाच हेलिकॉप्टर मागविण्यात आल्याचे माहिती मिळत असून आतापर्यंत एक हेलिकॉप्टर घटनास्थळी पोहोचले.
33 जवान आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. आगीच्या ज्वाला भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठिण होत आहे. परिसरात धुराचे लोट दिसून येत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने हेकॉप्टरची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काचेची इमारत असल्याने आगीमुळे काचा तडकत आहेत. आगीत इमारतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या इमारतीत अभिनेता ऋतिक रोशन याचे कार्यालय आहे. ऋतिकनेही घटनास्थळाला भेट दिली आहे. आग प्रचंड मोठी असूनही घटनास्थळी एकाही राजकीय नेत्याने भेट दिलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.