मुंबईत गारठा, १० अंशावर थंडीचा पारा

मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2013, 06:14 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय. रस्त्यारस्त्यांवर शेकोट्या पेटायला लागल्यात. रात्री स्वेटरशिवाय बाहेर पडणं निव्वळ अशक्य झालंय.
रविवारी मुंबईतलं तापमान तब्बल 10 अंशांपर्यंत खाली आलं होतं. गेल्या दहा वर्षांमधला मुंबईतला हा सगळ्यात जास्त थंडी असणारा तिसरा दिवस. गेल्या चार वर्षांत हिवाळ्यात मुंबईतलं तापमान लक्षणीय कमी होतंय. उत्तर भारतातून येणा-या थंड वा-यांमुळे मुंबईला हुडहुडी भरलीय.

मुंबईत सध्या स्वेटर विकणा-यांची चांगलीच चांदी झाली आहे. मुंबईकरांनी या थंडीचं आनंदाने स्वागत केलंय. असंच वातावरण वर्षभर रहावं, अशी मुंबईकरांची इच्छा आहे.