म्हाडा लॉटरी न लागलेल्यासाठी महत्त्वाची बातमी

 मुंबईतील म्हाडाच्या ९७२ घरांच्या लॉटरीमध्ये ज्या व्यक्तींना स्थान मिळाले नाही, अशा व्यक्तींची अनामत रक्कम कधी मिळणार हा प्रश्न आता सर्वांना सतावत असेल. 

Updated: Aug 10, 2016, 10:40 PM IST
म्हाडा लॉटरी न लागलेल्यासाठी महत्त्वाची बातमी

मुंबई :  मुंबईतील म्हाडाच्या ९७२ घरांच्या लॉटरीमध्ये ज्या व्यक्तींना स्थान मिळाले नाही, अशा व्यक्तींची अनामत रक्कम कधी मिळणार हा प्रश्न आता सर्वांना सतावत असेल. 

आता आम्ही तुम्हांला याचं उत्तर देत आहोत. म्हाडाने आपल्या साइटवर सर्व गोष्टीचे शेड्युल दिले. त्यानुसार ज्या व्यक्तींना म्हाडाची लॉटरी लागली नाही.  त्यांना येत्या २० ऑगस्ट रोजी आपले पैसे मिळणार आहेत. 

म्हाडासाठी अनेकांनी १५ हजार, २५ हजार, ५० हजार आणि ७५ हजार रुपये अनामत रक्कम भरली होती. ही रक्कम अर्ज भरताना दिलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे. 

ही रक्कम सकाळी दहा वाजता तुमच्या खात्यात जमा होणार आहे.