कोपर्डी बलात्काराचे विधानसभेत जोरदार पडसाद, विरोधक आक्रमक

विधानसभेत कोपर्डी प्रकरणाचे पडसाद दिसून येत आहेत. विरोधक काळ्या फिती लावून सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रश्न उत्तरांचा तास स्थगित करुन चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली.

Updated: Jul 19, 2016, 12:54 PM IST
कोपर्डी बलात्काराचे विधानसभेत जोरदार पडसाद, विरोधक आक्रमक title=

मुंबई : विधानसभेत कोपर्डी प्रकरणाचे पडसाद दिसून येत आहेत. विरोधक काळ्या फिती लावून सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. प्रश्न उत्तरांचा तास स्थगित करुन चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली.

कोपर्डी बलात्कार प्रकारणी सर्व पक्षांची स्थगन प्रस्तावाव्दारे चर्चेची मागणी करण्यात आली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे प्रश्नोत्तराच्या तासावर ठाम राहिलेत. वेगळा पायंडा नको म्हणत १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले..

राज्य विधीमंडळाच्या दुस-या दिवशी आज पुन्हा एकदा कोपर्डी बलात्कार आणि हत्येचा मुद्दाच गाजताना दिससत आहे. कामकाज सुरू होताच विरोधकांनी कोपर्डी घटनेचा स्थगन प्रस्ताव स्विकारण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून केवळ कोपर्डी प्रकरणावरच चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांनी केली. 

मात्र विधानसभा अध्यक्ष मात्र अगोदर प्रश्नोत्तराचा त्रास घेऊन मगच कोपर्डीवर चर्चा घेण्यासाठी आग्रही होते. यावरून झालेल्या गोंधळानंतर विधानसभेचं कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. विरोधकांनी अध्यक्ष हरिभाऊ बागडेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली आहे, अशीदेखील सूत्रांची माहिती आहे.   

काय उमटले पडसाद?

- प्रश्नोत्तराचा तास रद्द करून कोपर्डी घटनेचा स्थगन प्रस्ताव स्वीकारावा,  विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी

- सरकारची चर्चेचीी तयारी, पण प्रश्नोत्तराचा तास घेण्याची विरोधकांना विनंती  -  गिरीश बापट

- हा विषय अत्यंत गंभीर आह, या विषय़ापेक्षा प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा नाही , या घटनेनंतर गावातील ३०० मुलींनी शाळेत जाणे बंद केले आहे.
- दिलीप वळसे-पाटील