मुख्यमंत्री म्हणतात, आधी `मी` आणि मग `आप`

राज्याचे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या गाडीचा लाल दिवा काढला, हा आप इफेक्ट आहे, असा अनेकांनी अर्थ काढला.

Updated: Feb 9, 2014, 06:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या गाडीचा लाल दिवा काढला, हा आप इफेक्ट आहे, असा अनेकांनी अर्थ काढला.
मात्र हा आप इफेक्ट नसून, अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होण्याच्या दोन महिनेअगोदर मुख्यमंत्र्यांनी हा दिवा काढल्याचं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज यांना मिस्टर क्लीन असंही म्हटलं जातं, त्यांनी पदावर आल्यानंतर संशयित प्रकरण बाजूला ठेवली आणि मंत्रालयातील दलालीला चाप बसवला.
लाल दिव्याची गाडी ही मुख्यमंत्री, पंतप्रधान तसेच राष्ट्रपती अशा महत्वाच्या पदावर असेलल्या व्यक्तींच्या गाडीला लावला जातो.
मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दिवा आपची दिल्लीत सत्ता येण्याच्या आधीच काढला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.