मुंबई: मुंबईत आज 'स्वाभिमान यूनियन'शी निगडीत ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आपल्या मागण्यासाठी आज सकाळपासूनच एक दिवसीय संप पुकारला. त्यामुळं दिवसभर प्रवाशांचे खूप हाल झाले. स्वाभिमान यूनियननं दावा केलाय की, 18 हजार ऑटोरिक्षा मालक आणि 12 हजार टॅक्सी मालक याचे सदस्य आहेत.
'स्वाभिमान यूनियन'च्या मुंबईतील अध्यक्ष के. के. तिवारी यांनी सांगितलं की, दिवसभर सुरू असणारा संप संध्याकाळी 5 वाजता संपेल. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
यापूर्वी यूनियनं परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उबर, ओला, मेरू प्लस सारख्या मोबाइल अप्लिकेशनवर आधारित कॅब चालविण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता.
दरम्यान, ए. एल. क्वाड्रोस यांच्या टॅक्सी यूनियननं संपाला समर्थन केलं नाही. तर शशांक राव यांच्या नेतृत्वातील सर्वात मोठ्या ऑटो यूनियननं आपण
17 जूनपासून संपावर जाणार असल्याचं जाहीर केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.