मुंबई : एकीकडे स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याची अणेंनी मागणी केली आणि त्याला जबरदस्त विरोध देखील झाला. त्यांच्या या विधानामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला.
महाराष्ट्राचे विभाजन करून देवगिरी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ अशी चार राज्य व्हावे असे वक्तव्य आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो वैद्य यांनी केलं आहे.
नवीन राज्य पूनर्रचना आयोग नेमावा आणि त्या आयोगाने तीन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले राज्य वेगळे करावे, असं मत वैद्य यांनी मांडलं.