जेव्हा विनातिकीट प्रवास कऱणारी महिला म्हणाली, आधी मल्ल्याला पकडा

किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय माल्यावरुन सोशल मीडियावर अनेक जोक्स फिरतायत. मात्र मुंबईमध्ये रविवारी जे झाले त्याने यालाही पाठी टाकले. 

Updated: Mar 22, 2016, 01:59 PM IST
जेव्हा विनातिकीट प्रवास कऱणारी महिला म्हणाली, आधी मल्ल्याला पकडा title=

मुंबई : किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय माल्यावरुन सोशल मीडियावर अनेक जोक्स फिरतायत. मात्र मुंबईमध्ये रविवारी जे झाले त्याने यालाही पाठी टाकले. 

रविवारी टीसीने विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका महिलेला पकडले. यावेळी टीसीने तिला दंड भरण्यास सांगितले मात्र सरकारला ९ हजार कोटी रुपयांचा चुना लावून पळणाऱ्या माल्याला पकडले नाही आणि येथे गरीबांना त्रास दिला जातोय असे सांगत तिने तो दंड भरण्यास नकार दिला. 

प्रेमलता भंसाळी असं या महिलेचं नाव आहे. आपण गरीबांसाठी लढत असल्याचे तिचे म्हणणे आहे. मात्र ती स्वत: गरीब नाहीये. ४४ वर्षीय प्रेमलता भुलेश्वर येथे राहते. तिचा पती व्यापारी आहे.

रविवारी ही महिला एलफिन्स्टन स्टेशनवरुन घरी परतत होती. यादरम्यान महालक्ष्मी स्टेशजवळ टीसीने त्यांना पकडले आणि तिकीट दाखवण्यास सांगितले. प्रेमलता यांनी तिकीट काढले नव्हते. जेव्हा तिला दंड म्हणून २६० रुपये भरण्यास सांगितले तेव्हा मात्र तिने ते भरण्यास नकार दिला. त्यानंतर तिला 

त्या म्हणाल्या ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवणारा माल्या देश सोडून गेला मात्र त्याच्याकडून एक रुपया वसूल करण्यात आलेला नाही मात्र इथे गरीबांनी १० रुपयांचे तिकीट काढले नाही तर त्यांच्याकडून दंड वसूल केला जातोय. विशेष म्हणजे तब्बल १२ तास ती रेल्वे अधिकाऱ्यांशी या गोष्टीवरुन वाद घालत होती. यावेळी तिने आपल्याला तुरुंगात पाठवावे अशी मागणीही केली. 

रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्या काही ऐकण्यास तयारच नव्हता. अखेर त्या महिलेच्या पतीला बोलवण्यात आले. मात्र पतीचे बोलणे ऐकून घेण्यासही नकार दिला. रविवारी रात्री उशिरा तिला घरी सोडण्यात आले. मात्र केसच्या सुनावणीसाठी तिला मंगळवारी बोलवण्यात आलेय.